Jnana Prabodhini Prashala

📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.    

Admission process

Admission Process / प्रवेश प्रक्रिया


Jnana Prabodhini Prashala is a secondary school (Std. 5th to Std. 10th) affiliated with the Central Board of Secondary Education (CBSE). The admission procedure for the 5th standard generally starts in the month of February. Admissions are given only through an entrance examination. Admissions in standard 6th to 10th are given if seats are vacant and only through an entrance examination.

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न माध्यमिक (इ. ५वी ते इ. १०वी) शाळा आहे. इयत्ता ५वीची प्रवेश प्रक्रिया साधारणत: फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होते. प्रवेश-चाचणी घेऊन प्रवेश दिला जातो. जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो.

Admission process for 5th standard


Admission forms can be filled on the website anytime when vacancy is available. (Validity: Current academic year). The first round of the entrance examination is generally held on any Sunday of February. The exact dates are released in the first week of February.

Important Note

For Academic Year 2026-27:

According to the government resolution dated 21st January 2015 & 23rd January 2015 regarding "The minimum age of Admission in school", the minimum age required for admission in 5th Standard is 10 years on 31st December 2026.

Date range for admission in 5th standard for the academic year 2026-27 is from 31 July 2015 to 15th January 2017.

Please note that you are not permitted to appear for the entrance examination more than once in the same academic year. In addition, any discrepancy or deviation from the provided information in the application may result in the cancellation of admission by the school without prior notice.

See the links and videos given below for the admission procedure and filling the form.


इयत्ता ५वी साठी प्रवेश प्रक्रिया


प्रवेशअर्ज प्रशालेच्या संकेतस्थळावर अथवा प्रशाला कार्यालयातून परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर मिळू शकतात (वैधता: चालू शैक्षणिक वर्ष). प्रवेश चाचणीची पहिली फेरी साधारणतः फेब्रुवारी महिन्यातील एका रविवारी होते. चाचणीच्या अंतिम तारखा या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केल्या जातात.

महत्त्वाची टीप

शैक्षणिक वर्ष २०२६-२७:

२१ जानेवारी २०१५ आणि २३ जानेवारी २०१५ च्या 'शाळेतील प्रवेशाचे किमान वय' यासंबंधीच्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२६ रोजी ५वी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले किमान वय १० वर्षे आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाचवीत प्रवेश घेण्यासाठी अर्जदाराचा जन्मदिनांक ३१ जुलै २०१५ नंतरचा व १५ जानेवारी २०१७ पूर्वीचा असावा व अर्जदार इ. ४थीमध्ये शिकणारा असावा.

कृपया लक्षात घ्या की एका शैक्षणिक वर्षात एकाहून अधिक वेळा प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी नाही. तसेच अर्जात दिलेल्या माहितीत कोणतीही तफावत किंवा फसवणूक आढळल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता आपला प्रवेश रद्द करण्याचा पूर्ण अधिकार शाळेला राहील.

प्रवेश प्रक्रिया व अर्ज भरण्याच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्स व व्हिडिओस जरूर बघा.

Instruction / सूचना Links / लिंक्स
5th Admission Process Flowchart / ५वी प्रवेश प्रक्रिया ओघतक्ता Flowchart in English
मराठीमध्ये ओघतक्ता
Instructions for 5th admission process / ५वी प्रवेश सूचना Instructions in English
मराठीमध्ये सूचना
Online Application for school admission for 5th / ५वी शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज Click Here
5th Entrance Examination Result / 5वी प्रवेश परीक्षेचा निकाल Click Here

Admission process for 6th to 10th standard


Admissions in standard 6th to 10th are given only if seats are vacant and only through an entrance examination. Admission forms can be filled on the website anytime whenever vacancy is available. (Validity: Current academic year). The entrance examination is generally held on the second Sunday of May.

Important Note

The vacancies for current academic year will be declared in the first week of May of that academic year.

Please note that you are not permitted to appear for the entrance examination more than once in the same academic year. In addition, any discrepancy or deviation from the provided information in the application may result in the cancellation of admission by the school without prior notice.

See the links and videos given below for the admission procedure and filling the form.


इयत्ता ६वी ते १०वी साठी प्रवेश प्रक्रिया


जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो. प्रवेशअर्ज प्रशालेच्या संकेतस्थळावर वर्षभरात केव्हाही भरता येतील (वैधता: चालू शैक्षणिक वर्ष) अथवा प्रशाला कार्यालयामध्ये परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपलब्ध होतील. प्रवेश परीक्षा साधारणत: मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेतली जाते.

महत्त्वाची टीप

'चालू शैक्षणिक वर्षातील रिक्त जागांसाठी प्रवेशप्रक्रिया त्या-त्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते.'

कृपया लक्षात घ्या की एका शैक्षणिक वर्षात एकाहून अधिक वेळा प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी नाही. तसेच अर्जात दिलेल्या माहितीत कोणतीही तफावत किंवा फसवणूक आढळल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता आपला प्रवेश रद्द करण्याचा पूर्ण अधिकार शाळेला राहील.

प्रवेश प्रक्रिया व अर्ज भरण्याच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्स व व्हिडिओस जरूर बघा.

Instruction / सूचना Links / लिंक्स
6th to 10th Admission Process Flowchart / ६वी ते १०वी प्रवेश प्रक्रिया ओघतक्ता Flowchart in English
मराठीमध्ये ओघतक्ता
Instructions for 6th to 10th admission process / ६वी ते १०वी प्रवेश प्रक्रियेसाठी सूचना Instructions in English
मराठीमध्ये सूचना
Online Application for school admission for 6th to 10th / ६वी ते १०वी शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज Click Here
6th to 10th Entrance Exam Result / ६वी ते १०वी प्रवेश परीक्षा निकाल Click Here

Selection Process has 3 Steps


No. Step Information
1 Form Submission The admission process starts normally in the month of February. Application forms can be collected from the school office or are also made available on the website. Forms can be filled online and form fees can also be paid online.
2 Entrance Exam The test consists of a battery of psychological tests. The test lasts for 3 hours. All tests being psychological tests, there is no need for any preparation. The test administrator gives instructions before starting the test. The child should appear for the test in a tension-free state of mind.
3 Result On the basis of performance in the test, the final list of selected candidates is declared.

प्रवेश प्रक्रियेच्या ३ पायऱ्या असतात.


क्र. पायरी माहिती
१ अर्ज जमा करणे प्रवेशप्रक्रिया साधारण फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. प्रवेशअर्ज ऑनलाईन किंवा कार्यालयातून घेता येतील. प्रवेशपरीक्षा शुल्क ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष भरता येईल.
२ प्रवेश परीक्षा प्रवेश परीक्षा ही मानसशास्त्रीय चाचणी असते. ही चाचणी साधारणत: ३ तास चालते. या मानसशास्त्रीय चाचण्या असल्याने त्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नसते. चाचणी सुरू होण्यापूर्वी परीक्षक योग्य त्या सूचना देतात. आपला पाल्य ताणरहित व मोकळ्या मनाने परीक्षेस उपस्थित असेल याची काळजी घ्यावी.
३ निकाल झालेल्या परीक्षेतील कामगिरीनुसार अंतिम निवडयादी जाहीर केली जाते.

Instruction for Filling Up Form


No. Steps Information
1 Application form submission and payment of entrance test fees Application form can be filled out online from the website or obtained from the school. Payment of the entrance exam fees can be done online using net banking, credit card, debit card, or wallets.

OR

In cash at the school.
2 Medium of instructions for the test and session Students can choose Marathi or English medium for the test. Parents are requested to fill the appropriate medium carefully, as the question papers will be given in the chosen language. Please check the venue, date, day, time, medium, session (Morning – 1, Afternoon – 2) and Group Number (Marathi – 1, English – 2) printed on the Hall Ticket.
3 School office timings and contact School office timings are as follows:

Monday to Friday - 11.00 AM to 5.00 PM
Saturday - 8.30 AM to 12.00 PM

(Excluding holidays.)

Contact: 020 – 24207121 / 22
Mobile: 9850995412
Mobile contact timings: Monday to Friday - 10.00 AM to 7.00 PM
Saturday - 8.00 AM to 1.00 PM

Email for inquiry about Admissions:
admission@jnanaprabodhini.org

अर्ज भरण्यासाठी सूचना


क्र. पायरी माहिती
१ प्रवेश अर्ज ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भरता येईल. प्रवेश अर्ज ऑनलाईन किंवा कार्यालयातून घेता येतील. प्रवेश शुल्क ऑनलाईन - डेबिट कार्ड, नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट इ. द्वारे

अथवा

प्रत्यक्ष कार्यालयात भरता येईल.
२ परीक्षेचे माध्यम व सत्र विद्यार्थ्यांना मराठी वा इंग्रजी माध्यमातून परीक्षा देता येईल. पालकांनी काळजीपूर्वक माध्यम निवडावे. परीक्षेची प्रश्नपत्रिका निवडलेल्या भाषेतूनच दिली जाते. परीक्षेचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, माध्यम व सत्र (सकाळसत्र – १, दुपारसत्र – २) आणि गट क्रमांक (मराठी – १, इंग्रजी – २) हे प्रवेशपत्रावर छापलेले असतात. ते काळजीपूर्वक तपासावे.
३ प्रशाला कार्यालयाची वेळ व संपर्क क्रमांक प्रशाला कार्यालयाची वेळ:

सोमवार ते शुक्रवार – स. ११.०० ते ५.००
शनिवार – स. ८.३० ते १२.००

(सुट्टीचे दिवस सोडून.)

संपर्क – ०२० – २४२०७१२१ / २२
भ्रमणभाष – ९८५०९९५४१२
सोमवार ते शुक्रवार – स. १०.०० ते ७.००
शनिवार – स. ८.०० ते ०१.००

प्रवेशाविषयी चौकशीसाठी ईमेल:
admission@jnanaprabodhini.org

Admission Resources


No. / क्र. Instruction / सूचना Links / लिंक्स
1 English Brochure Download
2 English Video Watch Video
3 मराठी माहितीपत्रक डाउनलोड
4 मराठी व्हिडिओ व्हिडिओ बघा
5 ज्ञानप्रबोधिनी, पुणे उपक्रम / प्रकाशने माहिती २०२६ Click Here
Scroll to Top