Admission ProcessThe schedule and details of admission for the academic year 2022-23 for standard 5th will be declared in the last week of January 2022.

इयत्ता ५ वीसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आणि तपशील जानेवारी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जातील.


Admission Process / प्रवेश प्रक्रिया

Jnana Prabodhini Prashala is a secondary school (Std. 5th to Std. 10th) affiliated with the Central Board of Secondary Examination (CBSE). The admission procedure for the 5th standard generally starts in the month of February. Admissions are given only through an entrance examination. Admissions in standard 6th to 10th are given if seats are vacant and only through an entrance examination.


ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न माध्यमिक (इ. ५वी ते इ. १०वी) शाळा आहे. इयत्ता ५वीची प्रवेश प्रक्रिया साधारणत: फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होते. प्रवेश-चाचणी घेऊन प्रवेश दिला जातो. जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो.Admission process for 5th standard

Admission forms can be filled on the website anytime throughout the year (validity: Current academic year) or can be obtained from the office after the declaration of the test date. The first round of the entrance examination is generally held on the third Sunday of February. The second round of the examination is generally held on the second Sunday of March. The exact dates are released in the first week of February.

According to the government resolution dated 21st January 2015 & 23rd January 2015 regarding 'The minimum age of Admission in school' the minimum age required for admission in 5th Standard is 9 years 4 months on 30th September 2021. Date range for admission in 5th standard for the academic year 2021-22 is from 1st June 2012 to 1st June 2011.

But this limitation is relaxed from '30th Sept 2012 to 1st May 2010' by Prashala only for the Entrance Examination. Students fitting in this range may appear for the Entrance Examination. But if the Government Regulatory Body does not allow, admissions will not be granted. For any further clarification contact office.


See the links and videos given below for the admission procedure and filling the form.


इयत्ता ५वीसाठी प्रवेश प्रक्रिया

प्रवेशअर्ज प्रशालेच्या संकेतस्थळावर वर्षभरात केव्हाही भरता येतील (वैधता: चालू शैक्षणिक वर्ष) अथवा प्रशाला कार्यालयातून परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर मिळू शकतात. प्रवेश चाचणीच्या दोन फेऱ्या असतात. पहिली फेरी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होते. प्रवेश चाचणीची दुसरी फेरी साधारणतः मार्च महिन्याच्या दुसर्‍या रविवारी होते. चाचणीच्या अंतिम तारखा या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केल्या जातात.

'शाळा प्रवेशासाठी किमान वय' या संदर्भातील नवीन शासन निर्णयानुसार (संदर्भ - आदेश दिनांक २१/०१/२०१५ व २३/०१/२०१५) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इ. ५वी प्रवेशासाठी वयोमर्यादा ही दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी ९ वर्षे ४ महिने पू्र्ण हवे अशी आहे. त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इ. ५वी प्रवेशासाठी वयोमर्यादा दि. १ जून २०१२ ते १ जून २०११ अशी आहे.

मात्र केवळ प्रवेशपरीक्षेपुरते हे बंधन '३० सप्टें. २०१२ ते १ मे २०१०' या तारखेपर्यंत प्रशालेतर्फे शिथिल करण्यात आलेले आहे. या मर्यादेतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. मात्र प्रवेश घेताना शासकीय नियमात न बसल्यास प्रवेश देता येणार नाही. आणखी माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क करावा.


प्रवेश प्रक्रिया व अर्ज भरण्याच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्स व्हिडिओस जरूर बघा.

 
Instruction / सूचना Links / लिंक्स
5th Admission Process Flowchart / ५वी प्रवेश प्रक्रिया ओघतक्ता
Instructions for 5th admission process / ५वी प्रवेश सूचना
Online Application for school admission for 5th / ५वी शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज
5th Entrance Examination Round 2 Result / ५वी प्रवेश परीक्षा फेरी २ निकाल

(Select "Std. 5th" and "Admission Offered" And/Or "Waitlisted Candidates" option to see the result.)

(निकाल पाहण्यासाठी "इयत्ता 5 वी" आणि "Admission Offered" आणि / किंवा "Waitlisted Candidates" पर्याय निवडा.)

5th Entrance Examination Round 2 Instructions / 5वी प्रवेश परीक्षा फेरी 2 सूचना
Admission process for 6th to 10th standard

Admissions in standard 6th to 10th are given only if seats are vacant and only through an entrance examination. Admission forms can be filled on the website anytime throughout the year (validity: Current academic year) or obtained from the office after the declaration of the test date. The entrance examination is generally held on the second Sunday of May.

As there isn't any vacant seat for std. 6th to 10th, no admission procedure will be held for the academic year 2021-22.

Interested candidates may fill a request application form on the following link but there is no assurance of any admission procedure.

See the links and videos given below for the admission procedure and filling the form.


इयत्ता ६वी ते १०वीसाठी प्रवेश प्रक्रिया

जागा उपलब्ध असल्यास इयत्ता ६वी ते १०वीसाठीदेखील प्रवेश चाचणी घेऊनच प्रवेश दिला जातो. प्रवेशअर्ज प्रशालेच्या संकेतस्थळावर वर्षभरात केव्हाही भरता येतील (वैधता: चालू शैक्षणिक वर्ष) अथवा प्रशाला कार्यालयामध्ये परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर उपलब्ध होतील. प्रवेश परीक्षा साधारणत: मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घेतली जाते.

या शैक्षणिक वर्षासाठी इ. ६वी ते १०वीसाठी कोणतीही जागा रिक्त नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया होणार नाही.

इच्छुक विद्यार्थी खालील लिंकवरून विनंतीअर्ज भरू शकतात, परंतु प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची खात्री नाही.

प्रवेश प्रक्रिया व अर्ज भरण्याच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्सव्हिडिओस जरूर बघा.

 
Instruction / सूचना Links / लिंक्स
6th to 10th Admission Process Flowchart / ६वी ते १०वी प्रवेश प्रक्रिया ओघतक्ता
Instructions for 6th to 10th admission process / ६वी ते १०वी प्रवेश प्रक्रियेसाठी सूचना
Online Application for school admission for 6th to 10th / ६वी ते १०वी शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज
6th to 10th Entrance Exam Result / ६वी ते १०वी प्रवेश परीक्षा निकाल

Selection process has 4 steps.

No. Step Information
1 Form submission The admission process starts normally in the month of February. Application Forms can be collected from the school office or are also made available on the website. Forms can be filled online and form fees can also be paid online.
2 Entrance Exam - First round The test consists of a battery of psychological tests. The test lasts for 2 hours. All tests being psychological tests, there is no need for any preparation. The test administrator gives instructions before starting the test. The child should appear for the test in a tension-free state of mind.
3 Entrance Exam - Second round (Only for shortlisted candidates of 5th entrance first round, not applicable for 6th to 10th) The candidates scoring marks above the prescribed norm are called for another test. ( Only for shortlisted candidates of 5th entrance first round, not applicable for 6th to 10th).
4 Result On the basis of performance in the test the final list of selected candidates is declared.

प्रवेश प्रक्रियेच्या ४ पायऱ्या असतात.

क्र. पायरी माहिती
अर्ज जमा करणे प्रवेशप्रक्रिया साधारण फेब्रुवारी महिन्यात सुरू हाेते. प्रवेशअर्ज ऑनलाईन किंवा कार्यालयातून घेता येतील. प्रवेशपरीक्षा शुल्क ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष भरता येईल.
प्रवेश परीक्षा - पहिली फेरी प्रवेश परीक्षा ही मानसशास्त्रीय चाचणी असते. ही चाचणी साधारणत: २ तास चालते. या मानसशास्त्रीय चाचण्या असल्याने त्यासाठी काेणत्याही पूर्वतयारीची गरज नसते. चाचणी सुरू हाेण्यापूर्वी परीक्षक याेग्य त्या सूचना देतात. आपला पाल्य ताणरहित व माेकळ्या मनाने परीक्षेस उपस्थित असेल याची काळजी घ्यावी.
प्रवेश परीक्षा - दुसरी फेरी (फक्त इयत्ता ५वीच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्यांसाठी, इयत्ता ६वी ते १०वीसाठी लागू नाही) ठराविक निकषांवर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी केली जाते. (फक्त इयत्ता ५वीच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्यांसाठी, इयत्ता ६वी ते १०वीसाठी लागू नाही)
निकाल झालेल्या परीक्षेतील कामगिरीनुसार अंतिम निवडयादी जाहीर केली जाते.

Instruction for filling up form

No. Steps Information
1 Application form submission and payment of entrance test fees Application form can be filled out online from the website or obtained from the school. Payment of the entrance exam fees can be done online by using net banking, credit card, debit card, or wallets.

OR

In cash at the school.
2 Medium of instructions for the test and session Students can choose Marathi or English medium for the test. Parents are requested to fill the appropriate medium carefully as the questions papers will be given in the chosen language. Please check the venue, date, day, time, medium, and the session(Morning – 1, Midnoon – 2, Afternoon – 3) & Group number (Marathi – 1, English – 2) printed on the Hall Ticket.
3 School office timings and contact School office timings are as follows :

Monday to Friday- From 11.00 to 5.00
Saturday – 8.30 to. 12.00

(Excluding the holidays.)

Contact : 20 – 24207121/22
Mobile number: 9850995412 (Please contact on mobile during - Mon. to Fri - 10.00 AM to 7.00 PM., Saturday 8.00 AM to 1.00 PM.)

Email for inquiry about Admissions: admission@jnanaprabodhini.org

अर्ज भरण्यासाठी सूचना

क्र. पायरी माहिती
प्रवेश अर्ज ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भरता येईल. प्रवेश अर्ज ऑनलाईन किंवा कार्यालयातून घेता येतील. प्रवेश शुल्क ऑनलाईन - डेबिटकार्ड, नेटबॅकिंग,क्रेडिट कार्ड, वॉलेट इ. द्वारे

अथवा

प्रत्यक्ष कार्यालयात भरता येईल.
परीक्षेचे माध्यम व सत्र विद्यार्थ्यांना मराठी वा इंग्रजी माध्यमातून परीक्षा देता येईल. पालकांनी काळजीपूर्वक माध्यम निवडावे. परीक्षेची प्रश्नपत्रिका निवडलेल्या भाषेतूनच दिली जाते. परीक्षेचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, माध्यमसत्र (सकाळसत्र – १, मध्यान्हसत्र – २, दुपारसत्र – ३) आणि गट क्रमांक (मराठी – १, इंग्रजी –२) हे प्रवेशपत्रावर छापलेले असतात. ते काळजीपूर्वक तपासावे.
प्रशाला कार्यालयाची वेळ व संपर्क क्रमांक प्रशाला कार्यालयाची वेळ:

सोमवार ते शुक्रवार – स. ११.०० ते ५.००
शनिवार – ८.३० ते १२.००

(सुट्टीचे दिवस सोडून.)

संपर्क – ०२० – २४२०७१२१/२२
भ्रमणभाष : ९८५०९९५४१२ (सोमवार ते शुक्रवार स. १०.०० ते ७.०० शनिवार –स. ८.०० ते ०१.००)

प्रवेशाविषयी चौकशीसाठी ईमेल: admission@jnanaprabodhini.org
 
No./ क्र. Instruction / सूचना Links / लिंक्स
1 English Brochure
2 English Video
3 मराठी माहितीपत्रक
4 मराठी विडिओ